Health & Living

Covaxine vaccine can induce immunity for 9 to 12 months, in response to Marathi experiences

कोरोना व्हायरसनं (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार उडवून दिला आहे. या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण मोहिम (Covid-19 vaccine) देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचं सावट अद्याप दूर झालेलं दिसत नाही. कोरोना व्हायरसनं (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे.
देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, तरी देखील रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या देशात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी 2 व्हॅक्‍सिन दिल्या जात आहेत. त्यात कोव्हॅक्‍सिन आणि कोविशील्‍डचा समावेश आहे. त्यात एम्‍सनं (Indian Institute of Medical Sciences) कोव्हॅक्‍सिन (Covaxin) या लशीबाबत मोठा दावा केला आहे.
AIIMS च्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती अशी की, भारत बायोटेकद्वारा निर्मित कोव्हॅक्‍सिनमध्ये (Covaxin) कोरोना व्हायरसचा संपूर्ण नायनाट करण्याची क्षमता आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोव्हॅक्‍सिन आपली रोग प्रतिकारक शक्ती 9 ते 12 महिने कायम ठेवू शकते. याचा अर्थ असा की, या काळात शरीरातील कोरोना व्हायरसचा पूर्णपणे नाश होईल. कोव्हॅक्‍सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोरोनाला मूळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे.
AIIMS भोपाळ आणि जम्मूचे अध्यक्ष डॉ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितलं की, कोव्हॅक्‍सिन (Covaxin) च्या पहिल्या आणि दूसऱ्या ट्रायलमध्ये ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. Covaxin चे कोणतेही गंभीर साइड इफेक्‍ट नाही. डॉ. गुप्ता म्हणाले, सध्या Covaxin वर पुढील टप्प्यात संशोधन सुरू आहे. Covaxin च्या फेज 3 ट्रायलचा डाटा देखील मार्च महिन्यात समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, कोव्हॅक्‍सिनच्या (Covaxin) पहिल्या आणि दूसऱ्या ट्रायलनंतर व्हॅक्सिनेशनवरून मोठा वाद सुरू झाला होता. Covaxin च्या तिसऱ्या ट्रायलशिवाय व्हॅक्सिनेशन सुरू करू नये, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, कोव्हॅक्‍सिन (Covaxin) पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा एक्‍सपर्ट आणि डॉक्‍टर करत आहेत.
Covaxin चे साइड इफेक्‍ट नाही
डॉ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितलं की, कोव्हॅक्‍सिन (Covaxin) ही लस आतापर्यंत लाखों नागरिकांना देण्यात आली आहे. कोव्हॅक्‍सिनचे (Covaxin) कोणतेही साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. देशभरात गेल्या एक महिन्यापासून लसीकरण मोहिम सुरू आहे. कोव्हॅक्‍सिनमुळे (Covaxin) कोणी दगावल्याचं वृत्त नाही. दरम्यान, ज्या औषधीत (drug) आजार बरा करण्याची क्षमता 50 टक्क्यांहून अधिक असते अशाच औषधींना मान्यता दिली जाते आणि कोव्हॅक्‍सिन संदर्भात देखील असंच झालं आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Controller Normal of Medicines of India (DCGI) गेल्या महिन्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्‍सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्‍डला आपात्कालीन परिस्थितीत वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती. Learn additionally – U.S. children under 16 to receive COVID-19 vaccine by end of summer: Fauci

Posted: Feb 18, 2021 2:12 PM


$(document).ready(function(){
$(‘#commentbtn’).on(“click”,function(){
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = “https://connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3”; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));

$(“.cmntbox”).toggle();
});
});

Related Articles

Back to top button
Close

Help Journalism! Disable Adblocker!

Please Disable AdBlocker. We're Group of Individuals who are working to provide important information, News, Updates, Tips etc. Please help us by disabling Adblocker on our Website. AS THIS IS ONLY POSSIBLE WAY TO RUNNING THIS WEBSITE.